Categories: क्राईम

Big News : संतोष जगताप हत्या प्रकरणी 2 आरोपींना पोलीसांनी पकडले

पुणे : संतोष जगताप या वाळू व्यावसायिकाच्या काल झालेल्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना पुणे पोलीसांनी पकडल्याचे समीर येत आहे. एका न्यूज चॅनलने पुणे पोलीस आयुक्तांच्या हवाल्याने हि माहिती समोर येत आहे.
संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करून हे आरोपी पळाले होते. त्यातील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त मिळत आहे. या आरोपींकडून काही घातक शस्त्रे आणि एक वाहन जप्त केल्याची
माहितीही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज मिसाळ आणि नन्या आदलिंग अशी असून त्यांना इंदापूर जवळून ताब्यात घेण्यात आले आहे.

संतोष जगताप याच्यावर गोळीबार करून हे हल्लेखोर एका वाहनातून पसार झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. या दोन आरोपींसह या हल्ल्यात सामील असणारे अजूनही काही आरोपी जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago