‘या’ कारणामुळे 28,29 जुलै रोजी पुण्यातील वाहतूक राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

पुणे : पुणे शहरातील वाहतूक 28 जुलै रात्री ते 29 जुलै सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही वाहतूक राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यामुळे बंद ठेवण्यात येणार आहे.

या ठिकाणची वाहतूक राहणार बंद – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 28 जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते 29 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत नांदेगांव-सनीजवर्ल्ड व सुसमार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड़, अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

नांदेगांव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन ती नांदेगांव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगांव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात येणार आहेत.  नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.