पोलीस होण्यासाठी ‛त्या’ ‛तिघांनी’ अवलंबला थेट गुन्हेगारांचा मार्ग ! सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेत करत होते ‛हे’ कृत्य, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड : पोलीस होण्याचे स्वप्न पाहून त्या तिघांना पोलीस होता होता थेट जेल ची हवा खावी लागली आहे. सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेवेळी या तिघांनी कॉपी करून पास होण्याचा थेट गुन्हेगारांसारखा मार्ग अवलंबिल्याने त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सशस्त्र पोलीस शिपाई होण्याचे त्यांचे स्वप्न एका चुकीमुळे भंगले आहे.

या घटनेबाबत निलेश अशोकराव धुमाळ (वय 37 वर्षे पोलीस नाईक ब.नं.696 व्यवसाय नोकरी) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1) प्रदिप आबासाहेब गदादे (चेस्ट नंबर 8882 रा.बेनवडी ता. कर्जत जि. अहमदनगर) 2) सुदर्शन उत्तमराव बोरूडे (चेस्ट नंबर 8885 रा. श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) 3) सतिश शिवाजी जाधव (चेस्ट नंबर 8887 रा. हिरडगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) या तीन जनांनवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23/07/2023 रोजी सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परिक्षा 2021 राज्य राखीव
पोलीस बल गट क्र.5 दौंड चे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी विद्यालय दौड, येथील वर्ग क्रमांक 18 मध्ये परिक्षा देण्यासाठी आलेले उमेदवार 1) प्रदिप आबासाहेब गदादे चेस्ट नंबर 8882 रा. बेनवडी ता. कर्जत जि. अहमदनगर, 2) सुदर्शन उत्तमराव बोरूडे चेस्ट नंबर 8885 रा.श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर 3) सतिश शिवाजी जाधव चेस्ट नंबर 8887 रा. हिरडगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी संगमताने सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परिक्षा 2021, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.5 दौड ता. दौड जि.पुणे चे पोलीस भरती लेखी परिक्षा मध्ये पास होवून नोकरी मिळविणेसाठी कॉपी करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक करीत असताना मिळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फिर्यादी यांनी सरकार तर्फे कायदेशिर फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोसई राउत हे करीत आहेत.