आमदार ‘राहुल कूल’, ‘सौ.कांचन कूल’ यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘तिरंगा रॅली’ संपन्न

दौंड : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या हर-घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून आज रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी आमदार राहुल कूल आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन राहूल कूल यांच्या नेतृत्वाखाली भव्य अश्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये हजारो युवकांनी सहभाग नोंदवला. यावेळी भारत माता कि जय, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, अश्या घोषणा देण्यात येत होत्या. ही रॅली यवत, भांडगाव, वाखारी, केडगाव, बोरीपार्धी, असा प्रवास करत चौफुला येथे या रॅलीची सांगता सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून देशात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून आज आमदार राहुल कूल आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन राहुल कूल यांच्या नेतृत्वाखाली यवत ते चौफुला अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

यवत मधून साधारण 9:30 च्या दरम्यान तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आमदार राहुल कूल आणि सौ.कांचन कूल हे दांम्पत्य बुलेटवर या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी आमदार राहुल कूल हे स्वतः गाडी चालवत होते तर सौ.कांचन कूल ह्या त्यांच्या पाठीमागे बसल्याचे यावेळी पहायला मिळाले.

ही रॅली यवत, भांडगाव, वाखारी, केडगाव, बोरीपार्धी, चौफुला असा प्रवास करत श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे पोहोचली. यावेळी रॅलीचे रूपांतर हे सभेत झाले. या सभेत आमदार राहुल कूल यांनी हर घर तिरंगा अभियान आणि स्वातंत्र्याची 75 वी या विषयवार भाषण केले. तसेच आपण केलेली विकास कामे, विरोधक करत असलेला अप प्रचार यावर भाष्य करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.