Categories: Previos News

दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर ‘फोटोशूट’साठी गेलेल्या 3 कॉलेज विद्यार्थ्यांचा ‘पाण्यात बुडून ’ दुर्दैवी ‘मृत्यू’

अख्तर काझी

दौंड : दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळील दौंड नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावामध्ये कॉलेजमधील तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. तलाव परिसरात फोटोशूटसाठी ते त्या ठिकाणी गेले असल्याची माहिती मित्रांनी दिली. सदर घटनेतील दोन मुले सखे चुलत भाऊ असून तिसरा त्यांचा मित्र आहे. आसरार अलीम काझी (वय 21), करीम अब्दुल हादी फरीद काझी( वय 20) अतिक उझजमा फरीद शेख (वय 20) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे तीनही विद्यार्थी शहरातील नवगिरे वस्ती येथील रहिवासी आहेत, हे तिघे मित्र दि.6मार्च रोजी दुपारी 4वा. च्या दरम्यान दुचाकी घेऊन फिरावयास घराबाहेर पडले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल बंद होता, त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राला मोबाईल वर संपर्क साधला असता त्याच्या मोबाईलची फक्त रिंग वाजत होती परंतु प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिघांच्या घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळेस तिघेही नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावावर जाणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे घरच्यांनी या परिसरामध्ये त्यांचा शोध घेत असताना तलावाशेजारी त्यांची दुचाकी, कपडे व बॅग नजरेस पडली. मुले पाण्यात बुडाले असल्याची शंका त्यांना आली त्यामुळे त्यांनी दौंड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसही तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत तलावातील पाण्यात मुलांचा शोध घेतला. साधारणतः रात्री 12 ते 12.30 वा च्या दरम्यान तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. तिघेही मित्र तलाव परिसरात फोटो शूट साठी गेले होते त्यापैकी एक पाण्यात उतरला बहुदा त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी दुसरा मित्र पाण्यात उतरला मात्र दोघांनाही पाण्याबाहेर पडता येत नाही व ते बुडत आहेत हे दिसल्याने तिसरा मित्रही त्या दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला तिघेही पाण्यात बुडाले असावेत अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी करीत होते, तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले त्यावेळेस एकाच्या हातामध्ये मोबाईल आढळला अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. मृतांपैकी असरार हा बीए परीक्षा उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत होता तर त्याचा चुलत भाऊ करीम व त्याचा मित्र अतिक हे दोघेही पुना कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स चे शिक्षण घेत होते अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली. तिघा मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago