दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला येथे मोठी दुर्घटना घडली आहे. दुचाकीवर केडगावाकडे चाललेले तिघेजन कॅनॉलच्या कठड्याला धडकून कॅनॉलमध्ये फेकले जाऊन यातील एकजण पाण्यात वाहून गेला आहे. जवळपास 24 तास होत आले तरी त्याचा तपास लागला नसल्याने चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.10 मार्च रोजी रात्री 9:00 वाजता प्रमोद चंद्रकांत गजभारे, सचिन दिनकर नारनोर , आकाश आश्रुबा डोईफोडे असे तिघेजण त्यांच्याकडील होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल नं. एम. एच.४२ / बी.ए/ २४६८ हीच्यावरून बोरीपार्धी चौफुला येथुन सुपा ते चौफुला जाणाऱ्या डांबरी रोडने केडगांवच्या २२ फाटा येथे निघाले होते. मोटार सायकल प्रदिप गजभारे हा चालवित होता तिघेजन चौफुला येथील इंद्रप्रस्थ हॉटेलच्या जवळ मुळा मुठा कॅनॉलच्या अलीकडे आले तेंव्हा त्यांचे समोरून येणा-या मोठया वाहनाची लाईट
प्रमोद गजभारे याच्या डोळ्यावर आल्यामुळे प्रमोद गजभारे याच्या ताब्यातील होंडा कंपनीची शाईन मोटार सायकलची मुळा मुठा कॅनॉलच्या पुलाच्या कडेला असलेल्या कठडयाला जोरात धडक बसल्याने प्रमोद गजभारे व सचिन दिनकर नारनोर असे दोघे मोटार सायकलसह कॅनॉलचे वाहते पाण्यात पडले तर खबर देणार आकाश डोईफोडे हे कॅनॉलचे कडेला बाहेर पडले होते.
सचिन दिनकर नारनोर हा पाण्यात वाहत जात असताना त्याला तेथील स्थानिक लोकांनी
रस्सीच्या सहाय्याने पाण्यातुन बाहेर काढले मात्र प्रमोद गजभारे हा कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात वाहुन गेला आहे. या अपघातामध्ये तिघांनाही मार लागला होता. अपघात होऊन जवळपास 24 होत आले तरीही पाण्यात वाहून गेलेल्या प्रमोद गजभारे याचा तपास लागला नसून त्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास यवत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.