पुणे जिल्ह्यातील या गावाचे पुनर्वसन होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पदरवाडी गावाचे पुनर्वसन करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात येत असून या गावच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

पदरवाडी गावाच्या कायम स्वरुपी पुनर्वसनास भूसंपादन व अन्य बाबींसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या गावाचे पुनर्वसन होईपर्यंत पावसाळा व आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचे तात्पुरत्या स्थलांतरासह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.