मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात सुरू झालेल्या द्वंद्व युद्धात आता नवनवीन बाबी समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी दाऊद चे कोकणातील घर सनातन घेतले तर मग सनातन आणि दाऊद चे संबंध आहेत असा त्याचा अर्थ होत नाही असे उत्तर दिले होते. आता यावर सनातन संस्थेने खुलासा केला असून सनातन चे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी माहिती देताना ते घर, जागा ही वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार दिल्लीतील ऍड.अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली असून तेथे लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी सनातन धर्म पाठशाळा या नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि ऍड अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही असे त्यांनी सांगितले आहे.
नवाब मलिक यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दाऊदचे घर सनातन विकत घेते यावर भाष्य केले होते. त्यावर सनातन संस्थेने खुलासा केला आहे.