मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या एका वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा महाराष्ट्र – कर्नाटक वाद उफाळून आला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाचढवत पडद्यामागे हालचालिंना वेग आला असून हे सरकार लवकर कोसळेल याला दुजोरा दिला आहे.
कर्नाटक चे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बोलताना महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जत तालुका कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला असून 40 ग्रामपंचायतींचा समावेश असलेल्या या तालुक्याने महाराष्ट्र सरकार त्यांना पाणी देण्यास असमर्थ असल्याचा ठराव संमत करून जत तालुक्यातील 40 गावांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने कर्नाटकात सामील व्हायचे आहे असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय पाटलावर याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत खासदार संजय राऊत यांनी बोलताना, महाराष्ट्रचे लचके तोडले जात असताना शिंदे गुवाहाटीला निघालेत, हे सरकार राहिले तर महाराष्ट्राचे आणखी पाच तुकडे होतील असे भाष्य केले आहे. माझी सुरक्षा काढून माझ्या जीवाशी खेळ केला जातोय असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला असून कर्नाटकात भाजप ची सत्ता असताना हे सर्व घडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.