Categories: क्राईम

अवचट मळा (केडगाव) येथे चोरट्यांचा धुमाकूळ ! तीन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला

केडगाव : केडगाव (ता.दौंड) येथील अवचट मळा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून येथील तीन शेतकऱ्यांच्या 3 ट्रॅक्टर च्या बॅटऱ्या या चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे.

अवचट मळा येथील जेष्ठ नागरीक आणि प्रसिद्ध बागायतदार सुभाषकाका अवचट यांनी दिलेल्या माहितीनुसार केडगावच्या अवचट मळा येथे दिनांक 12 जानेवारी रोजी रात्री या वस्तीवरील तीन शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या तीन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याचे संगितले. शेतकऱ्यांमध्ये सुभाषकाका अवचट, कैलास शेळके व सुनील शेळके या तीन शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी झाली असून या प्रकारामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये या परीसरात अनेकवेळा छोट्या मोठ्या चोऱ्या होत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असून पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago