Categories: क्राईम

दौंड मध्ये चोरट्यांनी 3 दुकाने फोडली, रोख रक्कम लंपास.. व्यापारी वर्गात चिंता

दौंड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यात असणारी रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली. मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

चोरट्यांनी दौंड शहरातील फोडलेली दुकाने

प्राप्त माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असणाऱ्या कालिका सुपर मार्केट या भांड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील अंदाजे 50 ते 55 हजार रुपये चोरून नेले असल्याची माहिती मिळत आहे. दुकानातील सीसीटीव्ही मधील चित्रीकरणानुसार पहाटे 3 ते 3. 30 वा.दरम्यान तीन चोरट्यांनी डाव साधला असल्याचे दिसते आहे. याच परिसरातील कुबेर रेडीमेड व साडी सेंटर या दुकानाचेही शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील 12 हजार 800 रु रोख रक्कम चोरून नेली असल्याची माहिती मालकाने दिली. त्याचप्रमाणे दौंड सिद्धटेक रोडवरील सिंधी मंगल कार्यालयाच्या समोरील किराणा मालाचे (होलसेल) दुकानही चोरट्यांनी फोडून चोरी केली आहे. मात्र या दुकानातील नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे याचा तपशील अजून मिळालेला नाही.

दौंड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. चोरी केल्यानंतर चोरटे चालत रेल्वे स्टेशनकडे जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील दुकान फोडी घटनेच्या पार्श्वभूमीवर दौंड मर्चंट असोसिएशन व दौंड व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांची भेट घेऊन शहरातून रात्रीची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सदर चोरींच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्यावर जरब बसवावी अशा मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी राजेश पाटील, राजेंद्र ओझा, स्वप्निल शहा, रुपेश कटारिया, संजय टाटिया, राजेश गायकवाड , शहानवाज पठाण ,अविनाश गाठे, प्रशांत कांबळे धरम लुंड तसेच दौंड मधील व्यापारी वर्ग उपस्थित होता.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago