Categories: क्राईम

हातात कुऱ्हाड घेऊन हॉटेल, बिअर बार लुटणारा अट्टल चोरटा जेरबंद | यवत, दौंड, श्रीगोंदा, बारामती, हडपसर येथील 12 चोऱ्या उघडकीस

पुणे : रात्रीच्यावेळी बंद असलेल्या परमिट बिअरबारची घरफोडी आणि दिवसाढवळ्या मोटार सायकल चोरी असा काहीसा कार्यक्रम आखून तब्बल 12 चोऱ्या करणाऱ्या सुशिक्षीत चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण च्या पथकाला यश आले आहे.

असा करायचा चोऱ्या संबंधित शहर आणि परिसरातील रात्रीच्या वेळी बंद केलेले परमिट बार आणि हॉटेलची खिडकी, दरवाजे उचकटून हा चोरटा आत प्रवेश करायचा. त्यानंतर हॉटेल मधील रोख रक्कम व दारूच्या बाटल्या असा माल चोरी करून तो पसार व्हायचा. यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्येच अश्या प्रकारच्या पाच घटना घडल्या होत्या.
प्रत्येक घटनेत एक इसम हातात कुऱ्हाड घेवून चोरी करत असल्याचे दिसायचे त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण
निर्माण झाले होते.

पुणे अधीक्षकांच्या सूचना, मार्गदर्शन सदर घटनांमध्ये पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अंकित गोयल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व घटनास्थळांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेटी देवून सीसीटीव्ही
फुटेज तपासले असता सर्व घटनांमध्ये एक इसम हातात कुऱ्हाड घेवून चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनाक्रम व घटनास्थळ पडताळले असता चोरी करणारा इसम हा चोरी करून दौंड-काष्टी बाजूकडे जात असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले. तपास पथकाने काष्टी परीसरातील गोपनीय बातमीदारांना सतर्क करून माहिती प्राप्त केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे आदित्य बाळासाहेब कवडे (वय २१ वर्षे रा. कोळगाव मानमोटी घारगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) यास ताब्यात घेण्यात आले.

आरोपीला विश्वासात घेवून त्याच्याकडे
चौकशी केली असता तो उच्चशिक्षीत असून त्याने यवत, बारामती, श्रीगोंदा परीसरातील हॉटेलचे खिडक्या व दरवाजे उचकटून चोरी केली असून मोटार सायकल देखील चोरी केल्या असल्याचे कबूल केले. त्याच्याकडून
तपासादरम्यान रोख रक्कम व तीन मोटार सायकल असा एकूण ३ लाख २२ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपीने खालील १२ ठिकाणी केलेले गुन्हे आले उघडकीस.
१) यवत १६६०/२०२३ भादंवि ४५७,३८०
२) यवत १७४६/२०२३ भादंवि ४५७,३८०
३) यवत १३८६/२०२३ भादंवि ४५७,३८०
४) यवत १४८८/२०२३ भादंवि ४५७,३८०
५) यवत १७४९/२०२३ भादंवि ४५७,३८०
६) बारामती तालुका ९१२/२०२३ भादंवि ४५७,३८०
७) बारामती तालुका ९२३/२०२३ भादंवि ३७९
८) बारामती शहर १००४/२०२३ भादंवि ३७९
९) दौंड ११९२ / २०२३ भादंवि ३७९
१०) श्रीगोंदा ९१९ / २०२३ भादंवि ३७९
११) श्रीगोंदा ८८९ / २०२३ भादंवि ३७९
१२) हडपसर १९९० / २०२३ भादंवि ३७९

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल (पुणे ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (बारामती विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव (दौंड
विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि कुलदीप संकपाळ, पो.स.ई. अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे,
आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीण, अतुल डेरे, यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago