सासवड : जेजुरीत खंडोबाच्या दर्शनाला येवून घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीच्या प्रमुखासह घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग (LCB) ला यश आले आहे. या टोळीकडून सोन्या, चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
जेजूरी-सासवड परीसरात दिवसा घरफोडी, चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हयांमध्ये दुपारच्या वेळेस बंद घरांची कडी-कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आलेली होती.
सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घरफोडी चोरीचे गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरू केला असता, जेजूरी व सासवड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची वेळ तसेच गुन्हे पद्धतीमध्ये साम्य होते. त्या अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. तपासण्यात आले होते.
गुन्ह्याविषयी गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करत असताना सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार राहुल हिरामण लष्करे (रा.
काळा खडक, वाकड ता हवेली जि पुणे) याने केले असून त्याने यापुर्वी अशाप्रकारचे दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत आणि तो लाल रंगाचे अपाचे मोटार सायकल वरून साथीदारासह नसरापुर फाटा परीसरात
येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावेळी सदर पथकाने राहुल हिरामण लष्करे आणि अजय एकनाथ चव्हाण (वय २२ वर्षे रा. जांभळी बुा ता. भोर जि. पुणे) मुळ रा. खांडवी ता गेवराई जि बीड यांना सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी जेजूरीला खंडोबाचे दर्शनासाठी आलेनंतर वाल्हे व सासवड शहरात सोसायटीतील बंद घरांची कडी कोयंडा
तोडून चोरी केली असल्याचे सांगितले.
आरोपींकडून गुन्ह्यात चोरी गेलेले चांदीचे पैंजण, जोडवी, नाकातील सोन्याची दोन नथ व मोबाईल फोन, तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली मोटार सायकल असा एकूण ५६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी राहुल हिरामण लष्करे हा सराईत असून त्याच्यावर पुणे शहर हद्दीत यापुर्वी पाच गुन्हे दाखल असून तो नव नवीन साथीदाराला घेवून चोरी करत असल्याची तपासात उघड होत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (बारामती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, राजू मोमीण, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, प्राण येवले यांनी केली असून आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास जेजूरी पोलीस स्टेशन करत आहे.