Categories: क्राईम

दौंड शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात 30 लाखांची चोरी

दौंड

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक परिसरातील व पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स दुकानात मोठी चोरी झाली असल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या खिडकीचे गज वाकवुन दुकानात प्रवेश करीत तब्बल 30 लाख रुपये किमतीचे मोबाईल व घड्याळे चोरून नेले असल्याची फिर्याद दुकानाचे मालक नीलकमल लुंड यांनी दिली आहे.

दि.18 मे रोजी सकाळी 9.30 वा. च्या दरम्यान दुकानाच्या कर्मचाऱ्यांनी दुकान उघडले असता, दुकानातील फरशीवर मोबाईल संचाचे मोकळे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने दुकानात चोरी झाली असल्याचे उघडकीस आले. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक विनोद घुगे,सहा. पो. नि. तुकाराम राठोड व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची सखोल माहिती घेतली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता साधारणतः रात्री 2.30 वा. च्या दरम्यान दोन चोरटे दुकानातील वस्तू चोरी करताना दिसून आले आहेत. दुकानातील मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याने पुण्याहून ठसे तज्ञांचे पथक व श्वानपथक बोलविण्यात आले असून या पथकाने दुकानातील प्रत्येक काऊंटर वरील आढळलेले ठसे तपासासाठी घेतले आहेत.

दुकानात काम करणाऱ्या जुन्या -नवीन कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. शहरात प्रसिद्ध असणाऱ्या या दुकानाची आधी रेकी करून चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस आपला डाव साधला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुकानाच्या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस पथक करीत आहेत. दुकानातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन चोरटे कैद झाल्याने त्या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहतुकीची नेहमी वर्दळ असलेल्या परिसरातील, मुख्य बाजारपेठेतीलच दुकान चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

12 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago