शिरूर : शिरूर येथे एक सोने चोरीची आगळी वेगळी घटना समोर आली आहे. त्यामुळे तपास करणारे पोलीसही चक्रावले आहेत. या घटनेत ७ लाख ६० हजार रुपयांचा १९ तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेला असून त्यामध्ये ४ लाख रुपयांचा १० तोळे वजनाचा सोन्याचा राणी हार, २ लाख ४० हजार रुपयांचा ६ तोळे वजनाचा सोन्याचा गंठण, १ लाख ,२० हजार रुपयांचा तीन तोळे वजन असलेल्या सोन्याच्या नेकलेसचा समावेश आहे.
यातील फिर्यादी राजेंद्र भाऊलाल पवार (रा. फ्लॅट नं.३०४ कमलपार्क, विद्याधाम शाळेजवळ, शिरूर.जि.पुणे) यांनी फिर्याद दिली की त्यांचे १९ तोळे सोन्याचे दागिने असलेला लाल रंगाचा बॉक्स हा रेक्झीनचे बॅगेमध्ये ठेवला होता. ती रेक्झीनची बॅग त्यांच्या बिल्डिंगच्या खाली असणाऱ्या छोटया बेंचवर गाडीमध्ये ठेवण्याकरीता ठेवली असता
ती त्यांच्याकडून त्या ठिकाणी विसरून राहीली. त्यानंतर ती रेक्झीनची बॅग बिल्डींगमधील कोणीतरी अज्ञात इसमाने उघडुन त्यातील लाल रंगाचे बॉक्समधील १९ तोळे सोन्याचे दागीने चोरी करून नेले आहेत किंवा तेथील एक महिला ज्यांना मॅडम म्हणतात व त्यांचे पती यांनी त्यांच्या मुलाला सांगुन ती रेक्झीन बॅग ही त्यांच्या घराजवळ आणुन ठेवली व बॅग घराजवळ ठेवण्याच्या
दरम्याण वर नमूद पती पत्नी यांनी त्या
रेक्झीन बॅगची चेन उघडुन त्यातील नमुद
वर्णनाचे सोन्याचे दागीने काढुन चोरी
केल्याचा दाट संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे.
फिर्यादि यांनी घडलेल्या प्रकाराबाबत बिल्डींगमधील लोकांना सोन्याच्या
दागीन्यांबाबत विचारपुस केली परंतु काही
एक माहीती न मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सोन्याची बॅग ज्यांनी त्यांच्या घराजवळ आणून ठेवली त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उंदरे करीत आहेत.