पाटस येथे जबरी चोरी,
घर फोडून 11 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे घर फोडून सुमारे ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २२/१२/२०२३ रोजी सकाळी ०९:०० ते दिनांक २५/१२/२०२३ रोजी सकाळी ०९:३० च्या दरम्यान, पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथे घडली आहे.

या घटनेची फिर्याद राजाराम शंकरराव गायकवाड (रा. पाटस शिवरत्न बंगला, ता. दौंड) यांनी दिली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या यांच्या राहत्या घरात, कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद दरवाज्याचे कुलुप तोडुन घरातील बेडरुमचा कोयंडा तोडत ११ लाख ३० हजारांचा माल
घरफोडी चोरी करून नेला आहे.

चोरी गेलेल्या मालाची माहिती

( १ ) ३,०००००/- रु. कि. एक ६ तोळे वजनाचा राणी हार जु.व.कि.अं.
(२) ३,०००००/- रु.कि.दोन तोळे. वजनाच्या दोन पाटल्या ( बांगडया ) जु.व. कि.अं.
(३) २,७५,०००/- रु.कि. चार ५..५ तोळे वजनाच्या दोन बांगडया जु.व.कि.अं
(४) १,५०,०००/-
रु. कि. एक ३ तोळे जु.व.कि.अं. गळयातील गंठण
(५) ५०,०००/- रु. कि. १ तोळे वजनाचे कानातील दोन फुले जु.व.कि.अं
(६) २५,०००/- रु.कि. एक अर्धा तोळा
वजनाची जु.व.कि.अं.
(७) रोख रक्कम. ३०,०००/- असा एकूण ११,३०,०००/-रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरी करण्यात आली आहे.