यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या 3 गावांत 5 ठिकाणी ‛चोरी’, 12 लाख 88 हजारांच्या ऐवजाची चोरी

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गावांमध्ये 5 ठिकाणी चोरी होऊन यामध्ये 12 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. मुद्देमालामध्ये सोनेचांदीचे दागिने आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

चोरी झालेल्या गावांमध्ये पारगाव (सालू मालू), कानगाव, दापोडी या 3 गावांचा समावेश असून यामध्ये सर्वात जास्त चोऱ्या ह्या पारगाव आणि कानगाव या गावात झाल्या आहेत. 5 ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये 2 चोऱ्या ह्या कानगाव आणि 2 चोऱ्या पारगावमध्ये झालेल्या असून 1 चोरी दापोडी गावामध्ये झाली आहे.

प्रथम चोरी ही पारगाव येथील हनुमंत वसव यांच्या घरी झाली असून त्यांच्या घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अस 2 लाख 8 हजार रुपायांचा ऐवज चोरीला गेला आहे. तर दुसरी चोरी ही कानगाव येथील प्रविण काळूराम मोरे यांच्या घरी झाली असून त्यांच्या घरातील 2 लाख 65 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली आहे. तिसरी चोरी ही कानगाव येथील तुकाराम रोहिदास चौधरी यांच्या घरी झाली असून या घरफोडीमध्ये त्यांच्या घरातील सुमारे 7 लाख 75 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.

चौथी चोरी ही दापोडी या गावात झाली असून विशाल लक्ष्मण गुळमे यांच्या घरातून 10 हजार 500 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे तर पाचवी चोरी ही पारगाव येथील तुषार अशोक ताकवणे यांच्या घरी झाली असून त्यांच्या घरातून 30 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर ही दुचाकी चोरीला गेली आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीतील 3 गावांमधून सुमारे 12 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून यवत पोलिसांनी आतातरी योग्य नियोजन करून चोरांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

विशेष सूचना – आमच्या बातम्या अथवा त्यातील मजकूर कोणीही चोरी करू नये, असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी