Categories: Previos News

‘चौफुला-केडगाव’ ते ‘न्हावरा’ महामार्गचे काम लवकरच सुरु होणार

पुणे : चौफुला – केडगाव – न्हावरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कूल यांनी दिली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गासंबंधित विविध समस्या तसेच दौंड तालुक्यासाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली.

सप्टेंबर महिन्यात केंद्रीय वाहतूक मंत्री मा.ना श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली होती, सदर बैठकीमध्ये आमदार राहुल कुल यांनी पुणे – सोलापूर महामार्गा संबंधित विविध समस्या मांडल्या होत्या तद्नुसार पुढील पाठपुराव्यासाठी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांची त्यांनी भेट घेतली.

या बैठकीमध्ये आमदार राहुल कूल यांनी खालील प्रमाणे प्रमुख मागण्या केल्या –

NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता (KM 16/800 ते 41/700 – लांबी 24.9 KM) या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.

  • पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत.
  • NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
  • NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त नवीन अंडरपास बांधण्यात यावा.
  • माननीय गडकरी साहेबांनी NH- 548 DG न्हावरा – केडगाव चौफुला रस्ताचे काम लवकरच सुरु करण्याचे तसेच पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व इतर सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन नितीन गडकरी दिले.
Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago