Categories: क्राईम

महिलेच्या गळ्यातील ‘दागिना’ हिसकावून पळणाऱ्या ‘चोरट्याला’ तरुणांनी ‘पाठलाग’ करून पकडले, ‘केडगाव’मधील घटना

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या उड्डाणपुलाजवळ एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला मात्र काही जागरूक तरुणांनी त्या चोरट्याचा पाठलाग करत त्याला पकडले असल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एक महिला रस्त्यावरून जात असताना एका 33 वर्षीय चोरट्याने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून पळून जाऊ लागला. या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर समर्थ पोलीस ॲकॅडमिच्या काही दोन तरुणांनी त्या चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा सुसाट पळत असताना त्याला पकडणारे तरूनही त्याच वेगाने त्याला पकडण्यासाठी येत असल्याचे पाहून त्या चोरट्याने जवळील शेतात जाऊन तेथे लपण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा पाठलाग करणाऱ्या त्या दोन तरुणांनी अखेर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा बारामती शहरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बातमी लिहीत असताना संबंधित आरोपीवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे आरोपी इसम आणि त्याला पकडणाऱ्या तरुणांची नावे समजू शकली नाहीत. मात्र धाडस करून चोरट्याला पकडणाऱ्या त्या तरुणांचे केडगावमध्ये कौतुक केले जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago