दौंड तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या ‘भीमा नदी’ पात्रातील ‘त्या’ 4 मृतदेहांचे भयान वास्तव समोर ! हत्या, आत्महत्या कि अपघात यावरून पोलीस तपासाला मोठी गती

दौंड : साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रामध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला आणि कायम अशी काही प्रेते नदीच्या पाण्यात वाहून येतात असा येथील लोकांना अनुभव असल्याने त्या गोष्टीला कुणी हवे तेवढे महत्व दिले नाही. मात्र सलग दोन-तीन दिवस साधारण चार मृतदेह या नदी पात्रात सापडली आणि संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली.

मृतदेहांचा शोध घेत असलेली रेस्क्यू टीम

याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, विभागीय पोलीस अधिकारी धस तसेच यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकाराची सखोल चौकशी सुरु केली. पोलिसांच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरल्यानंतर एक महत्वाची बाब समोर आली असून हे चारही मृतदेह हे एकाच कुटुंबातील असल्याचे आणि हे कुटुंब पोटापाण्यासाठी गावोगाव भटकंती करत असल्याचे समोर आले आहे.

एकाच कुटुंबातील पवार सासू, सासरे, त्यांचे जावई फुलवरे व त्यांची पत्नी यांचे मृतदेह सापडले असून त्यांच्या सोबत तीन लहान मुलेही असल्याची माहिती समोर येत असल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. हा अपघात आहे, घातपात आहे कि आत्महत्या हे लवकरच पोलीस तपासात उघड होणार असून एकाच कुटुंबातील लोकांचे मृतदेह पाहून संपूर्ण दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.