‘कर्तव्यावर’ असताना ‘पोलिसाचे’ झूम बराबर झूम ‘शराबी’ | दारू पिऊन पोलिस आला ‘ड्युटीवर’, दौंडमधील सलग दुसरी घटना

दौंड : दौंड शहरातील रेस्टहाऊस करिता नेमलेला पोलिस कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर आल्याने एकच खळबळ माजली आहे. या अगोदरही असाच प्रकार एका पोलिस कर्मचाऱ्याकडून घडल्याचे दौंडकरांनी पाहिले आहे. आता पुन्हा एकदा अजून एक पोलिस दारू पिऊन कामावर आल्याने पोलिसांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब बापुराव जाधव (वय-54,नेम-राज्य राखीव पोलिस बल गट नं 7,दौंड) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पोलिस नाईक /895 किर्तीशील श्रीकिशन कांबळे (रा.श्रीजोगिश्वरी अपार्टमेन्ट A/4,देवकी नगर दौंड ता.दौंड जि पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 18/03/2023 रोजी सायंकाळी 06.00 च्या सुमारास SRPF Gr 7 रेस्ट हाऊस, दौंड येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.18/03/2023 रोजी सायं.6:00 वाजता दौंड शहरातील रेस्टहाऊस करीता नेमलेले सपोना /895 किर्तीशील श्रीकिशन कांबळे हे रेस्ट हाऊस गार्डच्या कर्तव्यावर असताना मद्यपान करून ड्युटीवर आले होते. त्यांनी इतकी दारू प्यायली होती की त्यामुळे त्यांना साधे चालता देखील येत नव्हते. त्यामुळे संबधित पोलिस अमंलदार सपोना /895 किर्तीशील श्रीकिशन कांबळे यांना सहाय्यक समादेशक रघुनाथ शिंदे यांच्यासमक्ष हजर केल्यानंतर सदर अमंलदार पोना /895 किर्तीशील श्रीकिशन कांबळे (रा.श्रीजोगिश्वरी अपार्टमेन्ट A/4,देवकी नगर दौंड ता.दौंड जि.पुणे) हे रेस्ट हाऊसवर गार्डचे कर्तव्यावर असताना मद्यपान करून आले म्हणून त्यांच्याविरूध्द सरकार तर्फे फिर्याद देण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.