Categories: Previos News

सख्खा ‛भाऊ’ बनला पक्का ‛वैरी’, पंख्याच्या पात्याने मोठ्या भावाने केला लहान भावाचा ‛खून’

पुणे (हडपसर) :
सख्खा भाऊ हा कधी कधी पक्का वैरी होतो असे आपण ऐकत असतो मात्र याची प्रचिती आज पुण्यातील लोकांना नक्कीच आली असेल. कारण आज पुण्यातील हडपसर भागात मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाचाच पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
बाबू ऊर्फ प्रदीप शिवाजी गवळी (वय 23, सध्या रा.पंधरा नंबर हडपसर) असे हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मुळचा तूळजापूर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुण्यात आपला मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होता.
हडपसर पोलीसांनी या प्रकरणी मनोज शिवाजी गवळी (वय 28, रा.सध्या पंधरा नंबर, हडपसर) याला ताब्यात घेतले असून तो ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता. यातील मयत प्रदीप गवळी हा रिक्षा चालवण्याचे काम करत होता. मात्र त्याला विविध प्रकारचे व्यसनं असल्याने त्याचे आणि त्याच्या भावाचे कायम खटके उडत असायचे.
या सर्व प्रकारामुळे मनोज गवळी याची पत्नीही वैतागून माहेरी निघून गेली होती. मनोज आणि मृत बाबू उर्फ प्रदीप यांच्यात होणाऱ्या वादवादीतून अखेर मनोज याने त्याचा सख्खा भाऊ असलेला प्रदीप याचा पंख्याच्या पात्याने गळा चिरून खून केला. याची खबर हडपसर पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

22 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago