| सहकारनामा |
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून (The need for a strict lockdown in Maharashtra) अनेक जिल्ह्यांतील रुग्णालये अक्षरशा रुग्णांनी फुल झालेली आहेत. हि सर्व परिस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सूचना देताना 15 दिवस कडकडीत लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा अशी सूचना हायकोर्टाने केली आहे.
तसेच लोकांना अजूनही या आजाराचे गांभीर्य आले नसेल आणि लोक अजूनही बिनधास्तपणे फिरत असतील तर कोरोनाला कसं रोखलं जाणार असा सवालसुद्धा हायकोर्टाने उपस्थित केला आहे. राज्यामध्ये फैलावत असलेला कोरोना करण्यात आलेले लॉकडाउन याबाबत एक महत्त्वाचं निरीक्षण करण्यात आलं असून राज्यात अजूनही बिकट परिस्थिती असतानाही लोक बाहेर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.
त्यामुळे लोकांना अजूनही कोरोनाचे गांभीर्य आलेले दिसत नाही त्यामुळे राज्यात आता पूर्णपणे 15 दिवसांचा कडक लॉकडाऊनशिवाय (The need for a strict lockdown in Maharashtra) सद्यस्थितीवर मात करणे अवघड आहे. त्यामुळे राज्य सरकारने पूर्णपणे 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी सूचना न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडे केली आहे.