Categories: Previos News

The mother-in-law beat son in law – सासूने जावयास काठीने बदडले! दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| सहकारनामा |

दौंड : अनेकवेळा नवऱ्याने पत्नीला मारले, जावयाने सासूला मारले अशा बातम्या वाचायला मिळतात मात्र दौंड शहरामध्ये चक्क सासुनेच जावयाला काठीने बदडल्याची घटना घडली असून दौंड पोलीस ठाण्यात जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासूसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लक्ष्मण जयसिंग पासलकर (रा.लिंगाळी ता.दौंड) यांनी फिर्याद दिली की दि.1 मे रोजी  त्यांच्या राहत्या घरी त्यांची सासू संगिता जयसिंग क्षीरसागर यांनी लक्ष्मण पासलकर यांना काठीने त्यांच्या पाठीवर आणि उजव्या डोळ्यावर मारहाण केली. 

सासूने मारहाण करत असताना लक्ष्मण यांचे मेव्हणे राजू जयसिंग क्षीरसागर व त्याचे मित्र पप्पू भोसले व कुंभार यांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर लक्ष्मण पासलकर यांनी वरील चौघांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago