The money will be credited to the autorickshaw driver’s account : रिक्षाचालकांच्या खात्यावर राज्य सरकारकडून पैसे जमा होणार! असा करा अर्ज



|सहकारनामा|

पुणे : कोरोना संकटामुळे रिक्षा चालकांच्या (autorickshaw driver’s) उदरनिर्वाहचा प्रश्न समोर उभा राहिला होता. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये (money credited to the autorickshaw driver’s account) 1500 रुपये जमा करण्याचा  नीटट 

 निर्णय घेतला होता. याची अंमलबजावणी येत्या 22 मे पासून सुरू होत असून लवकरच रिक्षाचालकांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत.

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना (autorickshaw driver’s) कोरोना काळात दीड हजार रु. अर्थसहाय्य देण्याची ऑनलाईन प्रक्रिया येत्या २२ मेपासून सुरु होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 

कोणतीही कागदपत्रं सादर न करता वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलाईन भरायची आहे. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांच्या खात्यात तत्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे.

याबाबत राज्य सरकारकडून अधिकृतरीत्या माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.