दौंड : अनेकांना प्रवास करताना आपल्या जवळील पैसे, वस्तू अथवा ऐवज चोरीला गेल्याचे अनुभव येत असतात या वस्तू एकदा गेल्या की त्या पुन्हा मिळतील याची शास्वती नसते. रेल्वे प्रवास करत असताना एका प्रवाश्याला मात्र याच्या उलट अनुभव आला आहे.


दिलीप बजाज हे परतूर ते पुणे असा रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांचे पैशांचे पाकीट गहाळ झाले. ज्यामध्ये 8,400 रुपये, दोन आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड होते. पुण्यात आल्यानंतर आपले पाकीट गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याचवेळी रेल्वेत तिकीट चेकिंग करणाऱ्या टीसी ला हे पाकीट सापडले त्यांनी ते दौंड आरपीएफ पोलिसांना दिले. आरपीएफ पोलिसांनी दिलीप बजाज यांचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांना त्या पाकिटात एक व्हिजिटिंग कार्ड सापडले.
त्या व्हिजिटिंग कार्डवर असणाऱ्या मोबाईल नंबरवर पोलिसांनी फोन केला त्यावेळी त्यांनी दिलीप बजाज यांचा नंबर दिला. दिलीप बजाज यांना संपर्क झाल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र अभिजित काळे यांना ते पाकीट आणि ऐवज देण्यास सांगितले. वस्तू गहाळ झाल्यानंतर ती टीसी ने पोलिसांना दिली खरी पण त्यानंतर खऱ्या मालकाला शोधण्यासाठी दौंड आरपीएफ पोलिसांनी मोठे कष्ट घेतले आणि ते पाकीट आणि ऐवज अखेर त्याच्या मालकाला पोहोच झाले.
पैसे आणि ऐवज त्याच्या मालकाला देण्यासाठी दौंड आरपीएफ चे पोलीस उपनिरीक्षक राकेश कुमार, सहाय्यक फौजदार अर्चना निंबाळकर, हवालदार एम एम आडकर
पोकॉ. सचिन जगताप, पोकॉ. नाना कैचे यांनी विशेष परिश्रम घेतले.







