पुणे : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच चिघळले आहे. विविध ठिकाणी आमदारांची घरे, वाहने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पक्षाची कार्यालये आंदोलकांनी पेटवून दिली आहेत. आमदार प्रकाश सोळंकी यांचं घर आंदोलकांनी पेटविल्यानंतर बीड येथे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर यांचे बंगळे जाळले जाळण्यात आले आहे.
राज्यात आंदोलकांकडून जाळपोळ.. सोलापूर येथे दोन बसेस पेटविण्यात आल्या आहेत तर हिंगोलीमध्ये भाजपाचे कार्यालय आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय पेटविण्यात आले आहे. याबाबत उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जाळपोळ करणाऱ्यांना हे थांबवा अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा ईशारा दिला आहे. तसेच जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे असे म्हटले आहे.
उपोषकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन सत्ताधाऱ्यांचे असाल, नसाल तरीही जाळपोळ बंद करा.. अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपला शांततेत लढा सुरू आहे; परंतु काही ठिकाणी होणारी जाळपोळ, उद्रेक पाहता थोडी शंका येत आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी हा लढा आहे. त्यामुळे जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका. आज रात्री, उद्या दिवसा मला कुठेही जाळपोळ केलेले किंवा नेत्यांच्या घरी गेल्याची बातमी आली तर मला उद्या रात्री प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
राज्यातील या भागांमध्ये जाळपोळ, तोडफोड.. सोलापूर येथे दोन बसेस जाळण्यात आल्या, संभाजीनगर, गंगापूर चे आमदार प्रशांत बंब यांच कार्यालय फोडलं गेलं, हिंगोलीच्या वसमत तहसील कार्यालयात मराठा आंदोलकानं दोरीनं गळफास घेण्याचा प्रयत्न केला, बिडमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. नाशिक चांदवड मध्ये आजी-माजी आमदारांमध्ये मोठी बाचाबाची विद्यमान भाजपा आमदारांना चले जाव च्या घोषणा, सांगलीच्या तासगाव बस डेपोमध्ये आंदोलकांनी जाऊन बसवर असणाऱ्या नेत्यांच्या फोटोंना काळे फासले, नाशिक, चांदवड येथेही तसाच प्रकार करण्यात आला.
शिर्डीत गुणरत्न सदावर्ते आणि नारायण राणे यांचे मुखवटे गाढवांना लावून मिरवणूक काढण्यात आली, परभणीत पाण्याच्या टाकीवर चढून एकाचे आंदोलन, समजूत काढायला गेलेल्या तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक, लातूरमध्ये मराठा आरक्षनासाठी महिला पाण्याच्या टाकीवर चढून बसल्या, रात्रभर सर्व महिला पाण्याच्या टाकीवरच होत्या. पुण्यातील भोर येथेही एसटी वरच्या फोटोना काळे फासण्यात आले. अश्या प्रकारे राज्यातील विविध भागांमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलकांकडून आंदोलन करण्यात येत असून बीड आणि धाराशिव मध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.