दौंड : मयत झालेल्या वयोवृध्द महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला यवत पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना वरवंड ता. दौंड येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.२५/०५/२०२४ रोजी वरखंड (ता. दौंड जि. पुणे) या गावातील विठठल मंदिराजवळ राहणाऱ्या वयोवृध्द महिला सुशिला मारुती केदारी (वय ८० वर्षे) या राहत्या घरामध्ये मयत अवस्थेमध्ये मिळून आल्या. त्यावेळी त्यांचे नातेवाईक व शेजारील ग्रामस्थ यांनी तिचा अंत्यविधी केला. परंतु त्या दरम्यान मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने नसल्याचे मयताच्या नातेवाईकांच्या निर्दशनास आले. त्यामुळे मयताचे नातेवाईक संतोष दगडू मनोचार्य (वय ५३वर्षे रा.काष्टी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) यांनी दि.०५/०६/२०२४ रोजी मयत व तिचे अंगावरील दागिने चोरी झालेबाबत संशय व्यक्त करत तक्रारी अर्ज यवत पोलिस स्टेशन येथे दिला होता.
सदरची बाब ही गंभिर असल्याने घटनास्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उप निरीक्षक सलीम शेख यांनी भेट देवुन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक सलीम शेख व कर्मचारी यांनी वरखंड गावातील सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा शुभम हिरामणपंडीत (वय २४ वर्षे रा. विठठल मंदिराजवळ वरवंड ता. दौंड जि. पुणे) याने केला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानंतर त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सलीम शेख (पोलीस उप निरीक्षक) एस. व्ही.चव्हाण (सहा. पोलीस उप निरीक्षक) बी. सी. बंडगर (पो. हवा) तसेच पोकॉ. देवकाते, टकले, मुटेकर खटके, भालेराव यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.