ज्याला मानले ‘काका’ तोच निघाला लिंगपिसाट नराधम, किशोर खेडेकरने ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड

दौंड : ज्याला आपला काका मानले, ज्याच्यावर वडिलांसारखा विश्वास ठेवला तोच लिंगपिसाट नराधम निघाला आणि काका म्हणवणाऱ्या या नराधमाने अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेत तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याची घटना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

किशोर शंकर खेडेकर (रा. देलवडी, ता.दौंड, जि.पुणे) असे या आरोपीचे नाव आहे. या नराधमाने त्याच्या मुलीच्या वयाच्या असणाऱ्या एका अल्पवायीन मुलीला विश्वासात घेऊन तू शाळेत इतर मुलांशी बोलत असते हे जर तुझ्या वडिलांना समजले तर ते तुला मारतील असे म्हणून चल आपण इथे जवळ कुठेतरी जाऊन या विषयावर बोलू असे म्हणून आपल्या गाडीत घेऊन एका हॉटेलमध्ये गेला. तेथे ही मुलगी वॉशरूमला गेली असता वॉशरूम चांगले नसल्याने ती पुन्हा माघारी आली. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपीने येथील टॉयलेट चांगले नाहीत तर तू येथील लॉज च्या रूममध्ये असलेल्या वॉश रूममध्ये जा आपण तेथील रूममध्ये बोलत बसू तेथे आपल्याला कोणी पाहणार नाही असे म्हणून तिला त्या लॉजमधील एका रूममध्ये पाठवले.

यावेळी त्याने ही रूम स्वतःच्या नावे बुक केली. मुलगी वॉशरूम मधून बाहेर आल्यानंतर किशोर खेडेकर याने त्या मुलीला तू शाळेतील इतर मुलांशी का बोलत असते, आता मी तुझ्या वडिलांना जाऊन सांगतो असा दम दिला. आपल्या वडिलांना आपण शाळेतील मुलांसोबत बोलतो हे समजले तर ते आपल्याला शाळेतून काढून टाकतील या भीतीने ही मुलगी रडू लागली व वडिलांना सांगू नका नाहीतर ते मळा शाळेतून काढतील अशी विनवणी करू लागली. त्यावेळी ज्याला ही मुलगी काका म्हणायची त्या काका म्हणवणाऱ्या या नराधमाने तिला आपल्या जवळ ओढून तिच्या पाठीवर हात फिरवत तू रडू नको मी नाही सांगत असे म्हणत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला.

पोलीस तपासात बलात्काराची बाब उघड झाल्याने आरोपीवर विनायभंग, अपहरण यांसह आता बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे हे करीत आहेत.