केडगाव / दौंड : गलांडवाडी ता. दौंड येथील अनाजी खाडे निराधार बालकाश्रमास मोठ्या प्रमाणावर आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे येथील संस्थाचालकांनी मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.
कै.आनाजी खाडे येथील अनाथ, निराधार बालकांचे संगोपन खाडे कुटुंबीय हे शासकीय अनुदानाशिवाय २५ वर्षे करीत आले आहे. या संस्थेस विविध मान्यवरांनी भेट देत भरघोस मदत केली आहे. तेथील अत्यंत बिकट असणारा पाणी प्रश्न सोडवल्याने अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले आहे.
गेल्या महिन्याभरात सहकारनामा वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त संपादक अब्बास शेख यांकडून मुलांना चविष्ट आणि रुचकर असे भोजन देण्यात आले होते, तर किरण परभाणे, वडगाव रासाई २५ टी शर्ट व २५ नाईट पॅन्ट, जिल्हा वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी कंपाउंड करता २५ सिमेंट बॅग, महेंद्र गरुड, खुटबाव यांनी तीन ब्रास क्रश सॅन्ड, पुण्यातील विजयानंद पोटे ५ हजार रुपये, केडगाव येथील तेजस कुंभार (भिगवणकर) दर महा १००० रुपये खर्च देतात. नायगाव येथील नानासो चौधरी यांनी आईच्या स्मरणार्थ एक दिवशीचे अन्नदान केले. उरुळी कांचन येथील सुशील गोगावले यांनी २५ बॅग सिमेंट दिले. यवत येथील स्वप्नील कांबळे, यांनी १५०० रुपये. गलांडवाडी येथील दत्तात्रय निगडे प्रत्येक वर्षी मुलींच्या वाढदिवसानिमित्त खाऊवाटप करतात. खुटबाव येथील आकाश तावरे खुटबाव यांनी मुलीच्या वाढदिवसानिमित्त जेवण, चाकण येथील डॉ प्रज्ञा भवारी यांनी ५००० रुपये धनादेश, शितल पाबळकर वाढदिवसानिमित्त रुपये १०,००० धनादेश दिला. गलांडवाडी येथील संभाजी शिवाजी शिंदे यांच्याकडून तीन संगणक व एक वेळचे विद्यार्थ्यांना जेवण दिले. केडगाव येथील शिक्षिका शबनम समीर डफेदार यांच्याकडून विद्यार्थ्यांना कपडे वाटप, सरपंच पेठ नायगाव, ता. हवेली सुरज चौधरी यांनी आश्रमासाठी बोरवेल घेण्यासाठी २० हजार रुपये तर राक्षेवाडी ता शिरूर संतोष राक्षे यांच्याकडून ८ हजार रुपये देण्यात आले.
नायब तहसीलदार पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालय शुभदा पंडित व पंडित पोद्दार फौंडेशन निगडी पुणे यांच्याकडून २५ हजार रुपयांचा धनादेश प्रजासत्ताक दिनी देण्यात आला. कै.तुकाराम धायगुडे व कै.सविता धायगुडे यांच्या स्मरणार्थ चौफुला, ता. दौंड येथील धायगुडे परिवाराने बोरवेल मारून दिले. कैलास विद्या मंदिर राहू येथील शिक्षक मित्रांनी १९९९ ते २००० या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा घेतला होता. मोटर, पाईप मोठी आर्थिक मदत संस्थेस केली. खुटबाव येथील युवकांनी बापू शिंदे,कानिफनाथ शिंदे,तुकाराम थोरात, मुकेश भापकर, विशाल बारवकर, आदीत्य थोरात यांनी ३० ब्लँकेट व खाऊ वाटप प्रजासत्ताकदिनी केले.
वडगाव रासाई येथील संतोष शेलार यांनी किराण्यासाठी २ हजार रुपये तर एकेरीवाडी येथील बापू बरकडे यांनी खाऊवाटप केला. केडगाव येथील अमोल मेमाने यांनी खेळाचे साहित्य सुमारे १० हजार रुपयांचे दिले. गलांडवाडी येथील मंदा शितोळे, , यवत येथील फारुख बागवान यांनी खाऊ वाटप केले. अनाथ आश्रमाचे माजी विद्यार्थी सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी,मुंबई रविंद्र कांबळे यांनी दोन गाड्या क्रश सॅन्ड कंपाउंड साठी मदत केली.
प्रसार माध्यमांच्या साहकार्याने संस्थेस मदत झाल्याचे संस्थेचे संस्थापक खंडेराव खाडे यांनी म्हटले. देणगीदारांचे प्रमिला खाडे यांनी आभार मानले आहेत.