संपूर्ण महावितरण कंपनीच 72 तासांच्या संपावर, 30 संघटना आंदोलनामध्ये सहभागी

पुणे : वीज मंडळातील होऊ घातलेल्या खाजगीकरणाविरुद्ध तसेच अदानी वीज कंपनीला नवी मुंबई, ठाणे, पनवेल येथे वीज वितरण परवानगी देऊन महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणारी महावितरण कंपनी मातीमोल भावाने भांडवलशाहीला आनदन देऊ नये यासाठी वीज मंडळातील सर्वच्या सर्व 30 संघटनांच्या वतीने 72 तासांचा (3 दिवस) बंद पुकारला आहे.

महावितरण ही जनतेची कंपनी वाचली पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून सदरचा संप पुकारण्यात आला असल्याचे वीज कर्मचारी संघटनेने जाहीर केले आहे. सदर संपामध्ये महावितरण मधील सर्व अभियंता, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी सहभागी असणार आहेत. संपाच्या कालावधीमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन व तांत्रिक सेवा देण्यास असमर्थ असणार आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास तो सुरळीत करण्यासाठी कोणीही उपलब्ध असणार नाही.

या कालावधीमध्ये जर वीज ग्राहकांची गैरसोय झाली तर त्याकरिता महावितरण तर्फे अधिकारी, कर्मचारी दिलगिरी व्यक्त करत आहोत असा मेसेज सोशल मीडिया वरून सर्वत्र व्हायरल करण्यात आला आहे.