आमदार ‘राहुल कूल’ यांच्या प्रयत्नांना अखेर ‘यश’, डोंबारी समाज बांधवांना मिळाले जातीचे दाखले

दौंड : कोणताही शैक्षणिक व महसुली पुरावा नसल्याने भटक्या समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार राहुल कूल यांनी मागील कालावधीत विधानसभेत पाठपुरावा करून या सर्व नागरिकांना दाखले मिळवून देण्यासाठी स्पॉट पंचनामे करण्याबाबत मागणी केली होती. त्यांची ही महत्वाची मागणी मान्य होऊन याबाबत निर्णय झाला होता.

शनिवार दि. 22 ऑक्टोबर रोजी दौंड तालुक्यातील खानवटे येथील सुमारे 47 डोंबारी समाजातील बांधवांना हे जातीचे दाखले उपलब्ध झाले. त्यांनी याबाबत आमदार राहुल कूल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आभार व्यक्त केले. आमदार कूल यांनी यापूर्वी देखील नंदीवाले, भिल्ल तसेच इतर भटक्या समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी विविध शिबिरांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.