Categories: सांगली

गणेशोत्सव काळातील ‘डीजे’ चा दणदणाट भोवणार! मिरजेतील तब्बल 35 ‘डीजे’ मालकांना पोलिसांचा दणका

सुधीर गोखले

सांगली : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये डॉल्बी च्या आवाजाने सर्वांचीच झोप उडवली होती मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळावर या आवाजाकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याची अप्रत्यक्ष टीकाही झाली होती मात्र पोलीस प्रशासनाने ठामपणे पहिल्यापासून आपला कारवाई करण्याबाबतचा पावित्रा बदलला नाही आज तब्बल ३५ डीजे मालक आणि गणपती मंडळांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावल्या असून पोलीस उपाधीक्षक यांच्या समोर या सर्वांची सुनावणी होणार आहे.

बजावण्यात आलेल्या या नोटिसींना समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित डीजे मालक आणि मंडळांवर न्यायालयात खटले दाखल होणार आहेत. यंदाच्या मिरवणुकीमध्ये ‘डॉल्बी’ ला परवानगी होती मात्र आवाज मर्यादाही होती. पण गणेश मंडळांकडून या आवाजाची मर्यादा पूर्णपणे पायदळी तुडवली गेली जवळजवळ २०० डेसिबल इतक्या आवाजाची तीव्रता आवाजाच्या मीटर मध्ये नोंदली गेली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली, मिरजे मधील भेटी दरम्यान आवाजाच्या मर्यादेवर भाष्य केले होते आणि कारवाईचा इशाराही दिला होता.

त्यानंतर पोलीस यंत्रणेने वेळोवेळी आवाज मर्यादेविषयी इशाराही दिला होता या काळात डॉल्बी च्या आवाजामुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता त्यानंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या आदेशावरून मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे ग्रामीण चे नारायण देशमुख महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सुधीर भालेराव यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीतील आवाजावर विशेष लक्ष देऊन संबंधित मंडळे आणि ‘डीजे’ मालक याना या कारवाई बाबत नोटीस बजावल्या आहेत लवकरच पोलीस उपाधीक्षक यांच्या समोर सुनावणी होईल.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago