सुधीर गोखले
सांगली : जिल्ह्यातील मिरज येथील किसान चौक म्हणले कि मोठ मोठ्या नेत्यांच्या सभांचे ठिकाण हे एक समीकरण ठरलेलेच, गेली सहा दशके या चौकातील सभांचा साक्षीदार अखेर जमीनदोस्त झाला आहे.
मिरज मधील मध्यवर्ती किसान चौकात लक्ष्मी च्या मूर्ती जवळ असलेले व्यासपीठ हे तत्कालीन नगरपालिका काळातील म्हणजेच १९६० साली अस्तित्वात आले. शेजारीच असलेल्या मिरज मार्केट च्या भव्य वास्तूच्या साथीने या व्यासपीठाने अनेक दिग्गजांच्या सभा गाजवल्या तब्बल सहा दशके हे व्यासपीठ मिरजकरांच्या सोबत होते अखेर महापालिका प्रशासनाने ते जमीनदोस्त केले व्यासपीठ धोकादायक इमारत घोषित झाली आणि अखेर एका सुवर्णकाळाचा अस्तच झाला.
या व्यासपीठावरील प्रत्येक सभांनी एक वेगळा इतिहास घडवलाय. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडे असोत किंवा अभिनयसम्राट दिलीपकुमार यांच्या सभा एक मिरजकरांसाठी सुखद आठवणीच राहिल्या आहेत. अभिनेते दिलीपकुमार यांच्या या व्यासपीठावरील एका सभेने तर मिरज मधील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदारकी मिळाली त्यांचे नाव दिवंगत आमदार हाफिजभाई धत्तुरे.
याच व्यासपीठावर जनता दलाचे माजी आमदार प्रा शरद पाटील यांची तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांची जाहीर सभा झाली. त्या आधी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील दिग्गज एस एम जोशी यांच्या संस्मरणीय सभेने तत्कालीन मिरज अक्षरशः ढवळून निघाले होते. जॉर्ज फर्नांडिस, माजी मुख्यमंत्री स्व यंशवंतराव चव्हाण, क्रांतीवीर नागनाथअण्णा, वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री डॉ वसंतदादा पाटील, शरद पवार, मुलायमसिंह यादव अशा आणि अनेक दिग्गजांचे पाय या व्यासपीठाला लागले.
मात्र गेली कित्तेक वर्षे या व्यासपीठाची अवस्था एखाद्या अडगळ खोली सारखी झाली हे व्यासपीठ अगदी बाजूला पडले कित्तेक संघटनांनी या व्यासपीठाच्या डागडुजीसाठी पुनरुभारणी साठी आंदोलने केली मात्र प्रशासनाने दुर्लक्षच केले. आज अखेर धोकादायक इमारतीचे लेबल या वास्तूला लागले गेले आणि हि वास्तू जमीनदोस्त झाली.
नवीन व्यासपीठाचा प्रस्ताव
काही दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या वास्तूबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन या ऐतिहासिक वास्तूची नव्याने उभारणी करण्यासंदर्भात निवेदन दिले होते त्यावर, उपायुक्त पाटील यांनी सुधार समितीच्या शिष्टमंडळास या वास्तूची त्याच जागेत नव्याने उभारणी संदर्भात प्रस्ताव प्रशासन पाठवेल असे आश्वासन दिले आहे. पाहूया आजपर्यंत तरी प्रशासनाने दखल घेतली नाही कालाय तस्मै नमः.