Categories: Previos News

आठ महिन्याची ‘गरोदर’ असलेल्या महिलेचा ‘मृतदेह’ यवत जवळ सापडला

दौंड : दौंड तालुक्यातील यवत जवळ असणाऱ्या कासुर्डी गावच्या हद्दीत वाहत्या कॅनॉलमध्ये एका 35 ते 40 वय असणाऱ्या गरोदर महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. ही महिला कोण आहे आणि तीचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबत यवत पोलिस तपास करीत आहेत. कॅनॉलमध्ये सापडलेली मृत महिला 7 ते 8 महिन्याची गरोदर असल्याने हळ हळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते यवत वाहते कॅनाॅलमध्ये यातील फिर्यादी ह्या कपडे धुणेसाठी कॅनाॅलवर गेल्या असता त्यांना एक अनोळखी महीलेचे प्रेत पाण्यात वाहत आलेले दीसले. त्यावेळी त्यांनी याची माहिती पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दीली. त्यांनी यवत पोलीस स्टेशन येथे माहिती कळवुन सदर प्रेत हे यवत ग्रामिण रूग्णालय येथे पाठवुन दिले.

सदर महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी यवत पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. घटनेचा अधिक तपास तपासी अंमलदार पो.स.ई.एस.व्ही.चव्हाण करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

10 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago