अखेर ‘त्या’ पाच जणांचे मृतदेह उजनी धरणात सापडले

इंदापूर : गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरणात सुरु असलेले शोधकार्य आज अखेर थांबले आहे. कारण ज्यांचा शोध घेतला जात होता त्या पाच जणांचे मृतदेह आज उजनी धरणात आढळून आले. उजनी धरणात बोट उलटून हा अपघात घडला होता. यात सहाजण  बेपत्ता झाले होते. NDRF कडून युद्ध पातळीवर या सगळ्यांचा शोध सुरु होता.

मिळत असलेल्या माहितीनुसार एका जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी यातील मृत जाधव पती-पत्नी गोकूळ जाधव, कोमल जाधव व त्यांची दोन लहान मुले आणि अन्य एक असे सहा ते सात जन कार्यक्रमाला जात होती.

हि घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. यातील दुर्घटनेतील सर्वजण नातेवाईकांकडे कार्यक्रमाला जात असताना त्यांची बोट वादळी वाऱ्यात सापडून उलटली. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक डोंगरे हे पोहून पोहून काठापर्यंत आले आणि त्यांनी गावात जाऊन या दुर्घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकरी आणि NDRF पथकाकडून यातील सहा लोकांचा शोध सुरु झाला. यावेळी 17 तासानंतर जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात हि बोट सापडली.

तर 36 तासानंतर आज सकाळी या सर्वांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.