अब्बास शेख
दौंड : राजकारण असो वा समाजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना टिका टिप्पणीला सामोरे जावेच लागते. अनेकजण अश्या टिकांना शब्दांनी उत्तर देतात मात्र आमदार राहुल कुल यांनी प्रत्येक टिकेला आपल्या कार्यातून उत्तर देण्याचे ठरवलेले दिसत आहे. राजकारणात टिकाकारांना अनन्य साधारण असे महत्व आहे त्यामुळे टिकाकारांनी कितीही टिका केली तरी मुरब्बी राजकारणी त्या टिकांना शक्यतो आपल्या कार्यातूनच उत्तर देतात त्यामुळे आमदार कुल सुद्धा भडक वक्तव्य न करता नम्रपणे आपल्या कार्यातून उत्तरे देताना दिसत आहेत.

आमदार राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आरोग्यदूत आमदार मिळाले. आरोग्यनिधीच्या माध्यमातून कुल यांनी २०१४ ते २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत केली. घर, जमीन, शेती विकून आपल्या घरातील आजारी रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना या मुळे मोठा दिलासा मिळाला. याचा सर्वात मोठा फायदा हा शेतकरी आणि गरीब, गरजू छोट्या व्यवसायिकांना झाला.
पुण्यातील अनेक हॉस्पिटल्स हे लाखो रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णाला हात लावत नसत मात्र आमदार कुल यांनी २०१४ साली आरोग्याशी निगडित काम हाती घेत मोठा पाठपुरावा सुरु केला. यानंतर शासनाच्या माध्यमातून आरोग्यनिधी सेवा जोमात सुरु झाली आणि ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ मिळू लागला. आजही कुल यांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना याचा फायदा मिळत असल्याचे दिसत आहे.
सध्या दौंड तालुक्यात झालेली विकासकामे आणि हडपसर ते यवत हा मंजूर झालेला महामार्ग, मेट्रो प्रकल्प तसेच मुळशीचे पाणी, तालुक्यात येत असलेली ऑटो इंडस्ट्रिजशी निगडित एमआयडीसी हे प्रकल्प लवकरच तालुक्याची आर्थिक नाडी मजबूत करणारे ठरणार आहेत. आमदार कुल यांनी दूरदृष्टीने केलेला दौंडचा विकास हा तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीने मोलाचा ठरत आहे. त्यातच आता येणारे नवनवीन प्रकल्प हे तालुक्यातील विकासात भर घालतील यात शंका नाही त्यामुळे टिका, टिप्पणीत वेळ घालवीण्यापेक्षा विकासात्मक निर्णय घेऊन विकास करायचा असा प्रयत्न आमदार राहुल कुल करताना दिसत आहेत.







