Categories: सांगली

सांगली जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला ! कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा, जयंत पाटील यांचे सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुधीर गोखले

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून दिवसाढवळ्या गोळीबार करत सराफी दुकाने लुटली जात आहेत.

दुसऱ्या बाजूला अवैध धंद्यांना ऊत आला आहे नशेबाजांचे प्रमाण वाढले असून त्यातूनच खुनांसारखे गुन्हे घडत आहेत जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने नागरिक भयभीत आहेत नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना पोलीस दलाने निर्माण करावी अशा आणि इतर काही सूचनांचे निवेदन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम जयंत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांना दिले.

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव शेखर माने, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, पद्माकर जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगेसागर घोडके यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्याशी काही मुद्या वर चर्चा केली जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यातील वाढलेला क्राईम रेट हा चिंतेची बाब असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून महाविद्यालयीन तरुण तरुणींचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे जयंत पाटील यांनी निक्षून सांगितले.

त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात प्रभावीपणे गस्ती होण्यासाठी ‘आर एफ आई डी’ ची यंत्रणा सध्या बंद का ठेवण्यात ठेवण्यात आली आहे ती त्वरित सुरु करावी पोलिसांच्या ठीक ठिकाणी उभ्या असलेल्या चौक्या बंद असून त्या नावापुरत्या नको तर पोलीस कर्मचारी तिथे तैनात करावा अजूनही शहरांमध्ये काही ठिकाणी सी सी टीव्ही बंद अवस्थेत असून तेही तातडीने सुरु करावेत रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे कोम्बिंग ऑपेरेशनही सातत्याने व्हावे शहरामध्ये नशेखोरांचे प्रमाण वाढले आहे हि चिंतेची बाब असून त्यामुळे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलिसांनी त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. या व अशा स्वरूपाच्या सूचना माजी मंत्री जयंत पाटील यांनी केल्या यावेळी निश्चित पणे आपल्या सूचना लवकरच अमलात आणू असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago