Categories: क्राईम

यवत जवळ एस.टी बसमधून कुरियर कंपनीचे 24 लाख रुपये लुटणारी टोळी गुन्हे शाखेने पकडली

पुणे : दि. ६/१०/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम खाजगी कंपनीचे कुरियर घेऊन पुण्याकडे एस.टी बस ने प्रवास करीत असताना त्या इसमावर काही लोकांनी पाळत ठेवत त्याच्याजवळ असलेली २४ लाख रुपयांची बॅग घेऊन ते पळाले होते. आता या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

या टोळीतील इसम हे एस.टी.मध्ये सहप्रवासी म्हणून बसले होते. गाडी यवत येथे येताच २ संशयित इसमांनी उठून सदरील कुरियर बॉय ला तु मुलींना का छेडतो असे ओरडून त्याला मारहाण करीत त्याच्या ताब्यात असलेले कुरियरची बॅग घेऊन गेले होते. सदर कुरियर बॉय ने यवत पोलीस स्टेशनला त्या अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार दिली होती. सदर बॅगमध्ये रोख २४ लाख रूपये असल्याचे कुरियर कंपनीचे मालक यांनी पोलिसांना सांगितले होते.

सदरील गुन्हा यवत पोलीस स्टेशन गु र न ८२४/२०२२ भा द वि का कलम ३९२, ३४ नुसार नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करिता स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ठ पथक नेमण्यात आले होते.
सलगच्या १५ दिवस केलेल्या तपासात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज दि. २४/१०/२०२२ रोजी खालील प्रमाणे संशयित इसम ताब्यात घेतले आहेत.

१) ओंकार दिनकर जाधव (वय २४वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर)
२) अनिकेत गोरख उकांडे (वय २३ वर्षे रा अकोळनेर ता नगर जि अहमदनगर)
३) किरण रामदास गदादे (वय २३ वर्षे रा तांदळी ता शिरूर जि पुणे)
४) तेजस मोहन दुर्गे (वय २० वर्षे रा म्हाडा कॉलनी बारामती ता बारामती जि पुणे)
५) गणेश बाळासो कोळेकर (वय २० वर्षे रा तावरे वस्ती सांगवी ता बारामती जि पुणे) तसेच सदरील गुन्हा त्यांचा आणखी एक साथीदार प्रेमराज उत्तम ढमढेरे (रा तांदळी ता शिरूर जि पुणे) याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. वरील १ ते ५ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रेमराज उत्तम ढमढेरे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला असून वरील ५ आरोपीना पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत.

सदरील कारवाई ही मा पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई शिवाजी ननवरे, पो हवा सचिन घाडगे, पो हवा विजय कांचन, पो हवा अजित भुजबळ, पो हवा अजय घुले
पो हवा राजू मोमीन, पो हवा दत्तात्रय तांबे
पो ना बाळासाहेब खडके, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago