सुधीर गोखले
सांगली : सां, मि आणि कुपवाड मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रताप सर्वसामान्य नागरिकांना काही नवीन राहिले नाहीत आज चक्क एका नागरसेवकांनाच हा प्रत्यय आला. प्रभाग क्रमांक वीस मधील नगरसेवक योगेंद्र थोरात हे आपल्या प्रभागातील विविध विकास कामाच्या प्रस्तावाच्या फाईल घेऊन मनपाच्या लेख विभागात गेले असता तेथील लेखा विभाग अधिकाऱ्याने चक्क कोंबड्याचा शेरा पाहिजे अशी अट घातल्याने आज नगरसेवक थोरात हे आपली फाईल आणि चक्क जिवंत कोंबडा घेऊन मनपा लेखा विभागामध्ये हजर झाले.
मात्र संबंधित अधिकारी गैर हजर असल्याने त्यांनी ता अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर फाईल आणि जिवंत कोंबड्यासह ठिय्या मारत आंदोलन केले. आज या नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अनोख्या आंदोलनाने मात्र सर्वत्र संबंधित अधिकारी चर्चेचा विषय बनून राहिले आहे.
त्याचे झाले असे कि नगरसेवक थोरात यांनी मनपा अर्थसंकल्पातील स्थानिक विकास निधीतून सुमारे ३० लाखांच्या कामाचे प्रस्ताव तयार केले पण गेल्या काही दिवसांपासून ते फाईल घेऊन मंजुरीसाठी फिरत आहेत, लेखा विभागाने त्यांना केवळ दहा लाखांचे काम मंजूर केले जाईल असे सांगितले त्याप्रमाणे थोरात यांनी केवळ दहा लाखांच्या विकास कामांचेच अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी लेखाधिकाऱ्याना दिले पण लेखा विभागातील या अधिकारी महाशयांनी त्या फाईल वर आयुक्तांचा कोंबडा नसल्याचे कारण देत फाईल मंजूर केली नाही.
यावेळी नगरसेवक थोरात यांनी या अधिकाऱ्यांना जाब हि विचारला पण समाधान कारक उत्तर न मिळाल्याने नगसेवक थोरात आज मनपा मध्ये आले तेही चक्क जिवंत कोंबडा घेऊनच. त्यांनी थेट लेखा विभाग गाठला पण नेहिमीप्रमाणे वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, मग काय त्यांनी फाईल आणि त्या जिवंत कोंबड्यासह मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मारला. आजच्या या नगरसेवक थोरात यांच्या अनोख्या आंदोलनाने महापालिके मध्ये एकच खळबळ उडाली सर्वत्र धावपळ झाली आज त्यांच्यासमवेत काँग्रेस चे नगरसेवक तौफिक शिकलगार होते. मनपा अधिकाऱ्यांनी मात्र नगरसेवक थोरात यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ऐकतील ते नगरसेवक योगेंद्र थोरात कसले आपल्या प्रभागातील विकासाठी कोणतीही तडजोड त्यांना मान्य नसते.