Categories: Previos News

केडगाव (गावठाण) मध्ये पाण्यावाचून नागरिक त्रस्त, दोन दिवसांतून एकदा पाणी तेही अवेळी!

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव (गावठाण) येथे पाण्यावाचून अक्षरशा नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून येथे पाणी दररोज न येता एक दिवस आड सोडले जात होते. मात्र आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात येऊन आता दोन दिवसांतून एकदा पाणी सोडले जात असून तेही कधीच वेळेवर येत नसल्याने अनेकजण या पाण्यापासून वंचित राहत आहेत. पावसाळा संपत नाही तोच पाण्याची इतकी वाईट परिस्थिती या भागात बनल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजन कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

केडगाव गावठाणात काही भागात अगोदर पाणी सकाळी 9:30 ते 10:00 दरम्यान सोडले जायचे. आता मात्र ते पाणी कधी सकाळी 7:00 वाजता, कधी 6:30 वाजता तर कधी 5:00 वाजता सोडले जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पाण्याचा हा गोंधळ मात्र महिलांना मानसिक त्रासाचे कारण बनत आहे. पाण्याचा हा सर्व खेळ गावातील सर्वसामान्यांच्या चांगलाच अंगलट येताना दिसत आहे. अजून पावसाळा संपला नाही तोच दोन दिवस आड पाणी सोडले जात असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले असून यावर त्वरित उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो यात शंका नाही.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

6 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

8 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago