दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ही मोठी बाजारपेठ! पण आता या बाजापेठेतील बाजार मैदानाचे दृश्य पाहून येथे काही खरेदी करावे कि नाही असा सवाल येथील नागरिकांना पडला आहे. कारण दौंड नंतरची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या या बाजारपेठेत आठवडे बाजाराकडे स्वच्छतेबाबत दुर्लक्ष होत असल्याने येथे कायमच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते.
याबाबत राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष योगिनी दिवेकर यांनी बोलताना, बाजारात माल घेऊन येणाऱ्याकडून तुम्ही पट्टया घेता मग त्यांना सुविधा न देता त्यांची गैरसोय पाहून एक सरपंच किंवा सदस्य म्हणून आपण सर्वांना मिळून ह्यावर उपाययोजना करावी वाटत नाही का असा सवाल उपस्थित केला आहे.
या परीसरात कायम घाणीचे साम्राज्य असते. त्यातच अधून-मधून पावसाच्या पाण्याचे डबकी साचत असल्याने येथील लोकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. केडगाव ग्रामपंचायत याबाबत लक्ष घालणार का आणि या परिसरातील घाण दूर होणार का याची येथील रहिवासी वाट पाहत आहेत.