Categories: राजकीय

राज्य ‘मंत्रिमंडळ’ विस्तार होणार! आतातरी दौंड’ला न्याय मिळणार का ?

अब्बास शेख

पुणे : राज्यात मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती मिळत असून दिवाळीनंतर हा मुहूर्त साधला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याला खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे जर हे मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर यात आता तरी दौंडचा समावेश होणार का असा सवाल येथील जनता राज्यकर्त्यांना विचारत आहे.

लवकरच होणाऱ्या या मंत्री मंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून यात दौंड चे आमदार राहुल कूल यांचा समावेश करण्यात यावा आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून दौंड सोबत न झालेला अन्याय आता भाजप ने दूर करावा अशी विनंती दौंडकर करत आहेत.
सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह 18 कॅबिनेट मंत्री असून भाजपचे 9 आणि शिंदे गटाचे 9 मंत्री आहेत.

सध्या भाजपचे 106 आमदार असून शिंदे गटास शिवसेनेच्या 50 च्या आसपास आमदारांचा पाठिंबा आहे.
सध्या एकनाथ शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद तर भाजपकडे उप मुख्यमंत्रिपद आहे. यात दोन्ही गटांच्या 9-9 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता यापुढे भाजप आपल्याकडे किती राज्यमंत्रिपद घेते आणि शिंदे गटाला किती मंत्रिपदे देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानांतर अनेक सरकारे आली आणि गेली मात्र दौंड तालुक्याला कधी मंत्रिपद मिळालेच नाही. काही ना काही कारण देऊन दौंडला फक्त मंत्रिपदाचे गाजर दाखविण्यात आले मात्र मंत्रिपद काही दिले नाही. 2019 च्या विधानसभेच्या प्रचारावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्रिपद’ देतो असे आश्वासन दिले होते. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात भाजप चा सुपडा साफ झाला असताना दौंडचा निकाल मात्र त्यास अपवाद ठरला आणि पुन्हा एकदा येथील जनतेने मोठ्या विश्वासाने राहुल कूल यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवले. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी आमदार राहुल कूल यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करून दौंडला न्याय द्यावा आणि आपला शब्द पाळावा अशी विनंती दौंड तालुक्यातील जनता करत आहे.

आमदार राहुल कूल यांचे पाणी, आरोग्य आणि रोजगार उपलब्धी यात मोठे योगदान असून त्यांनी सुचवलेल्या विविध योजना आज कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टी निर्णयाचा आदर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही करतात. त्यामुळे आता तरी या आमदाराला आणि पर्यायाने दौंड तालुक्याला न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा येथील जनता करत आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

39 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago