दौंड येथे शेगर समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड येथे हिंदू शेगर समाजाचा वधू वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. हिंदू शेगर विकास मंच महाराष्ट्रकडून हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेती तसेच उच्च शिक्षित 70 वधू व 90 वरांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर काही वधू वरांच्या पालकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून  परिचय दिला. यावेळी शेगर समाजातील एमपीएससी (MPSC) मधून अधिकारीपदी निवड झालेल्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा व कोरोना काळात रुग्ण सेवा केलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोक आटोळे (मुद्रांक जिल्हा अधिकारी बीड)  उदघाटक म्हणून रामदास धावडे (समाजकल्याण अधिकारी पुणे म. न. पा.)  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अद्यक्ष रामदास येडे पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष आप्पासाहेब रांधवन यांनी केले  स्वागत कार्याध्यक्ष विष्णू वाकडे व सरचिटणीस सचिन चवरे यांनी केले. सूत्र संचालन अक्षय गटकळ व अक्षय खोमणे यांनी तर आभार बाळासाहेब गावडे सर यांनी केले.

या मेळाव्यासाठी उद्योजक बबनराव येडे, शिवाजी वाकडे, कुंडलिक धुमाळ, संजय भानुदास गावडे, अजिनाथ गटकळ, मनोहर हागारे, मोहन आटोळे, डॉ. एन. बी. येडे, डॉ. सोमनाथ पवार, डॉ. संदीप गावडे तसेच पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, बीड, धाराशिव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई तसेच मध्यप्रदेश मधील धार, इंदौर, बऱ्हाणपूर येथून अनेक वधू वर पालक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिषेक खारतोडे, संजय चौरे, सुनील गाढवे, सुभाष पवार सर, शिवाजी पवार, दत्तात्रय पवार, बाळू येडे, संजय गावडे, हरिष खोमणे, सचिन हागारे,भानुदास महाराज खारतुडे,प्रमोद वायाळ,बाळासाहेब बबन गावडे सर,बाळासाहेब नाना खरतोडे, प्रमोद गावडे संपत खरतोडे , सौ. वंदना गावडे, सौ.भारती गावडे, सौ. मनीषा गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले