दौंडमध्ये वातावरण तापले ! डॉ.भावना मारहाण प्रकरणी उद्या विराट ‛भीम जनआक्रोश’ मोर्चाचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांची नात डॉ. भावना गायकवाड( धुमाळ) यांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करणारे त्यांचे पती डॉ. सदानंद गायकवाड व त्यांची सासू व दिर यांच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या सर्व प्रकरणात डॉ. भावना गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दौंड मधील दलित संघटनांकडून दि. 21 ऑगस्ट रोजी भीम जनआक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. दौंड पोलिसांना आंदोलनाबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये, दौंड मधील दंतचिकित्सक डॉ. सदानंद धुमाळ व त्यांच्या कुटुंबीयांकडून डॉ. भावना धुमाळ -गायकवाड व त्यांच्या मुलीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी दौंड पोलिसात दि.14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सदानंद धुमाळ पोलीस स्टेशनला उपस्थित असताना देखील त्यास अटक न करता सोडून देण्यात आले, याकरिता कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

दौंड पोलीस स्टेशन येथे डॉ. भावना धुमाळ यांची तक्रार घेण्यास अकरा तास विलंब केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणातील डॉ. सदानंद धुमाळ याला सहकार्य करणारे सहकारी व त्यांची प्रेयसी व तिला पाठीशी घालणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच डॉ. सदानंद धुमाळ यांना त्वरित अटक करण्यात यावी

अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी दलित संघटनांचे पदाधिकारी रवींद्र कांबळे, सतीश थोरात ,अमित सोनवणे, नागेश साळवे, भारत सरोदे, नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे, नरेश डाळिंबे, राजू जाधव, सागर उबाळे, संजीव आढाव, सचिन खरात, आनंद बगाडे, अनिल साळवे, राजेश मंथने, आरिफ शेख, यादव जाधव तसेच आशाताई मोहिते आदि उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago