Categories: क्राईम

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अख्तर काझी

दौंड : खून ,दरोडा प्रकरणात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या व सात वर्षापासून फरार असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने श्रीगोंदा (अ‍.नगर) गावात सापळा रचत जेरबंद केले. मिथुन बंडा काळे (रा.अकोनी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 20 सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दौंड विभागात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली कि, 2017 साली दौंड तालुक्यातील सौरवडी गावात धावडे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये दरोडेखोरांनी घरातील लोकांना मारहाण करीत किमती ऐवज लुटून नेला होता. त्या प्रकरणातील तसेच मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेला फरार आरोपी मिथुन काळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा गावातील बाजारपेठेत येणार असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साध्या वेशात श्रीगोंदा येथे रवाना झाले. पोलीस पथकाने बाजारपेठेत सापळा रचला व खबरी कडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयितास ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखविताच त्याने आपण मिथुन बंडा काळे असल्याचे सांगितले. आरोपीस पुढील तपास कामी दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago