‘त्या’ विद्यार्थिनी करणार ‘विश्वविक्रम’, रचणार नवा इतिहास

सुधीर गोखले

सांगली : जिल्ह्यातील मिरज शहरातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थिनींचा प्रवास सध्या विश्वविक्रमच्या दिशेने सुरु आहे. ज्युबिली कन्या शाळा हि मिरज मधील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असणाऱ्या शाळेमध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती विश्वविक्रमाच्या नोंदीची सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी “Maximum Groups Maximum Songs’ अर्थात मुलींचे २५ गट २५ मराठी वैविध्यपूर्ण गीतांचे गायन सादर करणार आहेत अर्थात हा एक जागतिक विक्रम ठरणार असून हा सहशालेय शैक्षणिक अभिनव उपक्रम कन्या शाळेने आयोजित केला आहे.

यासंदर्भात ‘सहकारनामा’ ने मुख्याध्यापिका आणि या उपक्रमाच्या प्रमुख संकल्पक श्रीमती सोपल यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या कि ‘विद्यार्थिनींमध्ये देशाबद्दल, महाराष्ट्राबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल जागरुकता निर्माण व्हावी तसेच त्यांच्यामध्ये एकसंघ भावना निर्माण होऊन विद्यार्थिनींचा सर्वागीण विकास व्हावा’ हा या उपक्रमाचा हेतू आहे. तसेच या उपक्रमात, प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थिनीस सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व शालेय स्टाफ सुध्दा या उपक्रमात सहभागी होणार आहे.

हा विश्वविक्रम ज्युबिली इंग्रजी कन्या शाळेच्या प्रांगणात सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी ०८.३० ते १२.३० या वेळेत संपन्न होत आहे. यावेळी फेसबुक द्वारेही कार्यक्रमामध्ये सहभागाचे आवाहन
या उपक्रमामध्ये नागरिकांना देखील सहभागी होऊन उपक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी खास सोशल मीडिया चा उपयोग केला गेला आहे.

फेसबुक या सोशल मीडिया चा चा वापर केला गेला असून आपण ही सर्वजण या विश्वविक्रमाचे भाग होऊ शकता, त्यासाठी आपणांस फेसबुक लिंक पाठवली जाईल. या लिंक चा वापर करून फेसबुक द्वारे आपण सर्वजण ऑनलाईन सहभाग नोंदवू शकता. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवून आनंद मिळवा आणि तुमच्या या उपक्रमात सहभागी छोट्या मैत्रिणींना प्रोत्साहन द्या असेही त्यांनी आवाहन केले.