शिखर सम्मेदजी या जैन धर्मियांच्या धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात याबाबत निदर्शने करण्यात येत आहेत. दौंड तालुक्याचे आमदार राहुल कूल यांनीही याबाबत आता राज्यसरकारला पत्र पाठवून हे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळाच्या यादीतून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे.
आमदार राहुल कूल यांनी या पत्रामध्ये, जैन धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी बाबत झारखंड राज्य सरकारचा पर्यटन स्थळ घोषित करण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा. याबाबत केंद्र व झारखंड सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तसेच जैन धर्मीयांच्या भावनांचा विचार करता श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून घोषित न करण्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि झारखंड राज्य सरकारकडे शिफारस करण्यात येईल असा मला विश्वास आहे असेही नमूद करण्यात आले आहे.