राज्यस्तरीय स्तरावरील तेर (TER) ऑलंपियाड ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत शेठ ज्योती प्रसाद विद्यालयास दुहेरी यश



दौंड : सहकारनामा

विद्यार्थ्यांच्या बाल मनामध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती व कृती निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे येथील तेर पॉलिसी सेंटरच्या वतीने गेल्या सहा वर्षापासून पर्यावरणावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषाचे आयोजन केले जाते.

सदर स्पर्धेत शेठ ज्योती प्रसाद विद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील मॅक्सिमम पार्टिसिपेशन कंटिन्युटी अवार्ड प्राप्त झाला असून प्रशालेतील 11वी शास्त्र मधील विद्यार्थी रोहित दत्तात्रय वालेकर याने राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण देशांमधून टॉप टेन मधून आठवा क्रमांक प्राप्त केला आहे.

ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये घेतली जाते. सदर स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेतली जाते. या स्पर्धेमध्ये देशभर मधून विद्यार्थी बसतात. यावर्षी या ऑनलाईन स्पर्धेत देशभरातून एकूण दोन लाख 74 हजाराहून अधिक विद्यार्थी सर्व गटातून बसले होते.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वर्च्युअल ऑनलाइन पद्धतीने नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या पत्र सूचना कार्यालयाचे संचालक डॉ निमिष रूस्तगी (डायरेक्टर प्रेस इंफॉर्मेशन ब्युरो इंडिया) तसेच श्री विनोद कुलकर्णी सी एस आर हेड पेन इंडिया टाटा मोटर्स व तेर पॉलिसी सेंटर पुणेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनिता आपटे ओलंपियाड स्पर्धेच्या समन्वयक राजकुमारी सूर्यवंशी आदी उपस्थित असल्याची माहिती प्रशालेतील या स्पर्धेचे समन्वयक मार्गदर्शक तथा राष्ट्रीय हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली.

प्रशालेस सन्मानपत्र व सन्मानचिन्ह व रोहित वालेकर यास सन्मानपत्र व ब्लूटूथ स्पीकर्स अशा स्वरूपाचे परितोषिक प्राप्त झाले आहे यशस्वी विद्यार्थी रोहित वालेकर व मार्गदर्शक शिक्षक  प्रमोद काकडे यांचे अभिनंदन भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य प्रदीप मस्के, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, उपमुख्याध्यापिका समीना काझी, पर्यवेक्षक मोहन खळदकर, माणिक अडसूळ व सर्व विद्यार्थी व शिक्षक सेवक वृंद यांनी केले.