‘तेजस’ फायटर जेट विमानाचा ‘दुबई एअर शो’ मध्ये अपघात, पायलटचा दुर्दैवी मृत्यू

International News

दुबई : दुबई मधील एअर शो मध्ये भाग घेतलेले तेजस फायटर जेट हे लढाऊ विमानाचे अचानकपणे खाली कोसळून या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. एअर शो मध्ये भाग घेतलेले हे विमान काही सेकंदात खाली कोसळळून मोठा स्फोट झाला आणि यात पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळत असलेल्या माहितीनुसार दुबई येथील अल मकतूम विमानतळावर एअर शो आयोजित करण्यात आला होता. यातविविध देशांतील लढाऊ विमानांनी भाग घेतला होता. यावेळी तेजस या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाचे नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले आणि काही समजण्याच्या आतच त्याचा मोठा स्फोट होऊन यात पायलटचा जागीच मृत्यू झाला.

तेजस चा दुसरा अपघात –
भारतीय हवाई दलाचे एलसीए तेजस मार्क-१ विमान जैसलमेरमध्ये ऑपरेशनल ट्रेनिंग दरम्यान कोसळले होते. ही घटना १२ मार्च २०२४ रोजी घडली होती, हा तेजस फायटर जेट विमानाचा पहिला अपघात होता.

दुबई एअर शोमध्ये आज दुसरा अपघात.. दुबई एअर शोमध्ये तेजस फायटर जेट विमानाचा आज दुसरा अपघात झाला. दुबई एअर शो दरम्यान प्रात्यक्षिक उड्डाण दाखवत असताना हे लढाऊ विमान जमिनीवर आदळले आणि त्याचा मोठा स्फोट झाला ज्यामुळे भीषण आग लागली. या अपघातात पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला.